घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घराला आग लागून ६ जण होरपळले. संसार साहित्याचेही मोठे नुकसान झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील दशमेशनगरात महादेव मंदिराजवळ मंगळवारी (३ मार्च) रात्री ११ च्या सुमारास घडली. भाजलेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी दुपारी हिनानगरमधील मंडप डेकोरेशन गोदामाला लागलेल्या आगीत ३ जणांचे संसार खाक झाल्याची बातमी असतानाच, रात्री ११ ला दशमेशनगरातील रहिवासी अमोल कबाडे यांच्या घराला अचानक आग लागली. काही वेळातच आग वाढत गेली. नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र प्रयत्न तोकडे पडत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशामुळे लागली, हे समोर आलेले नाही. अमोल कबाडे (वय ३३) यांचे दोन्ही तळपाय भाजले असून, कबाडे यांचे शेजारी असलेले संतोष लिंबारे (वय ५०) यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय भाजले. लक्ष्मी कबाडे, अश्विनी कबाडे, बंटी कबाडे यांच्यासह सात वर्षीय बालक अवचित कबाडे हाही होरपळून जखमी झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...

Latest News

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले... माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software