मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्‍दुल सत्तार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएसससीएन वृत्तसेवा) : खासदार झाल्यामुळे संदीपान भुमरे यांनी आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद रिक्त झाले. अनेक दिवस हे पद रिक्‍त राहिल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिले. त्‍यांनी निवेदन देताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदाची धुरा राज्याचे पणनमंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएसससीएन वृत्तसेवा) : खासदार झाल्यामुळे संदीपान भुमरे यांनी आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद रिक्त झाले. अनेक दिवस हे पद रिक्‍त राहिल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिले. त्‍यांनी निवेदन देताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदाची धुरा राज्याचे पणनमंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन चारेक महिन्यांसाठी का होईना आपले मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होईल ही आ. संजय शिरसाट यांना लागलेली अपेक्षा पुन्हा एकदा धुळीस मिळाली. सत्तार हे हिंगोलीचेही पालकमंत्री आहेत. त्‍यामुळे त्‍यांना दोन जिल्ह्यांचा पदभार सांभाळावा लागणार आहे. सत्तार हे छत्रपती संभाजीनगरचे पहिले अल्पसंख्याक पालकमंत्री ठरले आहेत, हे विशेष.

खासदार भुमरे यांनी सांगितले, की राजीनामा मागेच दिला होता. तो मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी सत्तार यांच्याकडे सोपविली आहे. पालकमंत्री कुणाला करावे, यावरून शिंदे गटात बरीच चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराचेही वारे वाहू लागले हाेते. संजय शिरसाट यांनाही पुन्हा एकदा आशा लागली होती. याच काळात मंत्री सत्तार यांनी शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार आहे, असे वक्‍तव्‍य केले होते, ज्‍याची चर्चा झाली होती. त्‍यांचा हा प्रासंगिक करार पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाच्या निमित्ताने समोर आला आहे.

विधानसभा निवडणुका आता दोन महिन्यांवर आहे. तरीही आ. संजय शिरसाट म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, उर्वरित दोन महिन्यांसाठी अनेकांना मंत्रिपदी संधी देण्याचा शब्द नेतृत्वाने दिला आहे. सत्तार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर या पदाची जबाबदारी दिली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात येणार आहे, असे ते म्‍हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software