परवानगी दिली नाही तरी जरांगे पाटलांची शांतता रॅली निघणारच; सकल मराठा समाजाचा इशारा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी नेते मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ६ जुलैपासून महाएल्गार शांतता रॅली काढणार आहेत. १३ जुलैला ही रॅली छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचणार आहे. मनोज जरांगे पाटील दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रॅलीला शहरात परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते रामभाऊ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी नेते मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ६ जुलैपासून महाएल्गार शांतता रॅली काढणार आहेत. १३ जुलैला ही रॅली छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचणार आहे. मनोज जरांगे पाटील दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रॅलीला शहरात परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांनी केल्यानंतर सकल मराठा समाजाने परवानगी न मिळाल्यास आणखी मोठी रॅली काढू, असा इशारा दिला आहे.

रॅलीच्या परवानगीसाठी पोलिसांना सकल मराठा समाजाने पत्र दिले आहे. आम्ही रॅली तर काढू, पण जेवढा विरोध झाला तेवढा मराठा समाज एकत्र येत आहे. रॅलीही तेवढीच मोठी होईल. रॅलीसाठी पोलिसांना पत्र दिले असून परवानगी न मिळाल्यास आणखी मोठी रॅली काढू, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक सुरेश वाकडे यांनी दिला आहे.

दरम्यान, रॅलीच्या तयारीसाठी जिल्हाभर जोरदार तयारी सुरू आहे. गाव, तांडा, वस्ती, वॉर्डात बैठका घेऊन रॅलीच्या दिवशी घरावर झेंडा भडकवा. अंगणात रांगोळी काढा, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. रॅलीच्या नियोजनासाठी सर्व तालुक्‍यांत समन्वयक नेमण्यात आले आहेत. रॅलीच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त एका प्रसिद्ध दैनिकाने आजच्या अंकात दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software