केणेकरांचे जरांगेंविरुद्ध वक्‍तव्‍य; मराठा आंदोलकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, संजय शिरसाट म्हणाले…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे व्यक्तिगत पातळीवर भाजप नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्यांच्या आंदोलनाला सुसंस्कृत, सुजाण मराठा समाजबांधवांचा पाठिंबा नाही. सरड्यासारखे रंग बदलणारी त्यांची भाषा आहे. ते मराठा आहेत की नाही, याचीच शंका येत आहे, असे वक्‍तव्‍य भाजपचे राज्य सरचिटणीस संजय केणेकर यांनी केल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे व्यक्तिगत पातळीवर भाजप नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्यांच्या आंदोलनाला सुसंस्कृत, सुजाण मराठा समाजबांधवांचा पाठिंबा नाही. सरड्यासारखे रंग बदलणारी त्यांची भाषा आहे. ते मराठा आहेत की नाही, याचीच शंका येत आहे, असे वक्‍तव्‍य भाजपचे राज्य सरचिटणीस संजय केणेकर यांनी केल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिडको पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी (१८ ऑक्‍टोबर) ठिय्या आंदोलन केले.

प्रा. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हनुमंतराव कदम, पंढरीनाथ गोडसे, संजय गायके, भरत कदम, पुरुषोत्तम झळके, राहुल मते, रामदास हांडके, हरीश आव्हाड, अभिषेक आगळे, सुशांत घोरपडे, सुनीता पाटील, विद्या मोहिते, रजनी अजबे यांचा आंदोलनात सहभाग होता. यावेळी कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

केणेकर असेही म्हणाले होते, की मराठवाड्यातील मराठ्यांसाठी जेव्हा शासनाने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारले. त्यामुळे जरांगे यांचा लढा आता कोणत्या भूमिकेवर आहे? जरांगे यांनी स्वतःचा डीएनए चेक करावा. भाजपचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. जरांगे यांनी व्यक्तीवर बोलण्याऐवजी शासनावर बोलले पाहिजे. ते कुणाचे तरी भाषा बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी आजवर मराठा बांधवांसाठी अनेक लाभदायी निर्णय घेतले आहेत. त्‍या निर्णयांमुळे मराठा बांधवांत त्‍यांची प्रियता वाढत असताना अशाप्रकारे त्‍यांना मराठा बांधवांच्या विरोधात जाणूनबुजून उभे केले जात आहे.

मनोज जरांगेंचा राग कमी करू : आ. शिरसाट
मनोज जरांगे यांचा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी आमचे नेते त्यांची भेट घेतील. त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. मंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीमधून किशोर बलांडे यांची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आ. शिरसाट म्हणाले, की जोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे उमेदवारी जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कोणीही अधिकृत उमेदवार नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software