पाकिस्तानमध्ये महिलांना दहशतवादी बनविण्यासाठी ऑनलाइन क्लास!

जैश-ए-मोहम्मद देणार ४० मिनिटांचे प्रशिक्षण ; ‘तुफत अल-मुमिनत'मध्ये करणार ‘ब्रेनवॉश’

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

इस्लामाबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऑनलाइन स्किल डेव्हलपमेंट क्लासेस चालतात, कोचिंग क्लासेस चालतात, पण आपण इस्लामिक देश पाकिस्तानबद्दल बोलत आहोत. तिथे एक ऑनलाइन जिहाद अभ्यासक्रम शिकवला जात आहे. यात महिलांना कसे बॉम्ब बनून फुटायचे, कसे १००-५० निष्पाप लोकांना मारायचे, याचे धडे देण्यात येणार आहेत. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदने हा कोर्स सुरू केला आहे. भविष्यात, पाकिस्तानमधील या जिहादी वर्गातून बाहेर पडणाऱ्या महिला त्यांच्या शरीरावर बॉम्ब बांधून स्फोट घडवून आणतील.

कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने "तुफत अल-मुमिनात’ ही महिला विंग सुरू केली आहे. या विंगमध्ये महिला दहशतवादी तयार केल्या जातील. ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम ८ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि संघटनेच्या दहशतवादी प्रचार नेटवर्कद्वारे थेट ऑनलाइन व्याख्याने दिली जातील. जैश-ए-मोहम्मदची स्थापना २००० मध्ये मसूद अझहरने केली होती. मसूद अझहर पूर्वी हरकत-उल-अन्सार नावाच्या संघटनेशी संबंधित होता.

या गटाचे उद्दिष्ट जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि इस्लामिक राज्य स्थापित करणे आहे. २००१ मध्ये भारतीय संसदेवर हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला आणि २०१९ मध्ये पुलवामा हल्ला यासह अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका या दोन्ही देशांनी जैशला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील जैशच्या तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला.

तुफत अल-मुमिनात म्हणजे काय?
जैशने आपल्या कारवाया पुढे नेण्यासाठी तुफत अल-मुमिनात नावाची महिला विंग सुरू केली आहे. ही विंग महिलांसाठी धार्मिक आणि वैचारिक प्रशिक्षण देईल, त्यांना दहशतवादाच्या विचारसरणी शिकवेल. योजनेबद्दल जैशने प्रचार करताना "इस्लामी महिलांना जागृत करण्याचा कार्यक्रम’ असे म्हटले आहे. यातून महिलांना इस्लामिक शिक्षण दिले जाईल. महिला सक्षमीकरण घडवले जाईल. मात्र सुरक्षा एजन्सींच्या मते, ही दहशतवाद्यांची भरती करण्याची एक नवीन पद्धत आहे. ज्याचा उद्देश महिलांचे ब्रेनवॉशिंग करणे आणि त्यांना दहशतवादी बनवणे आहे. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी शुल्क ५०० रुपये आहे आणि प्रशिक्षण सत्र दररोज ४० मिनिटे चालेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !!

Latest News

खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !! खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या खासगी ट्रॅव्हलचालक प्रवाशांच्या खिशावर अक्षरशः दरोडा घालत आहेत. दुसरीकडे त्‍यांना वेसन घालण्यात...
शेतात विद्युत पंप चालू करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, फुलंब्री तालुक्यातील दुर्दैवी घटना
पाकिस्तानमध्ये महिलांना दहशतवादी बनविण्यासाठी ऑनलाइन क्लास!
पहिले स्वदेशी स्टील्थ फायटर जेट... सावरण्याची संधीही न देता पहिल्या नजरेतच शत्रूंचा नाश करेल... १० आश्चर्यकारक वैशिष्ट्ये, वाचूनच भारतीय असल्याबद्दल छाती फुगेल...
जेईई मेन्स २०२६ : पहिल्या टप्प्याची परीक्षा २१ जानेवारीपासून, जाणून घ्या कधी भरावा लागेल फॉर्म
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software