छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलक-पोलिसांत झटापट, २५ आंदोलक ताब्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सरकारने घोषणा केली, पण प्रत्यक्षात अद्यापही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. दिवाळीपूर्वी मदत करण्याचे आश्वासन वांझोटे ठरले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी (२१ ऑक्‍टोबर) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर चटणी-भाकरी खाऊन अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी अडवले. आंदोलक आणि पोलिसांत काही वेळ झटापट झाली. आंदोलकांनी ठिय्या देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याने जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलकही आक्रमक होते. अर्धनग्न अस्थेत त्यांनी आंदोलन सुरू केले. घोषणाबाजीने परिसर दणाणला. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यासोबत चटणी-भाकर खाऊन साथ द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आणि त्याचबरोबर काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची धरपकड केली.

या वेळी पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट सुरू झाली. जवळपास २० ते २५ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर सोडून दिले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, राजू बोंगाणे, शिवाजी धरफळे, यादवराव कांबळे, गणपत खरे, पुरण सनान्से यांच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवली, पण येणाऱ्या निवडणुकीत सरकारलाही अंधारात जावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.  

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software