खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा !; छत्रपती संभाजीनगरचे RTO काढतंय झोपा !!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या खासगी ट्रॅव्हलचालक प्रवाशांच्या खिशावर अक्षरशः दरोडा घालत आहेत. दुसरीकडे त्‍यांना वेसन घालण्यात आरटीओ अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आर्थिक हितसंबंधामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीकडे आरटीओ दुर्लक्ष करत असल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्‍त होत आहे. दुप्पट-तिप्पट तिकीट आकारणीमुळे प्रवाशांची अक्षरशः लूटमार सुरू आहे.

Pi7_image_tool
रेड बस या बुकिंग साइटवरील खासगी ट्रॅव्हल्सचालकांचे वाढलेले दर.

छत्रपती संभाजीनगर- पुण्याचे तिकीट पार १२०० ते २००० रुपयांपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी नेऊन ठेवले आहे. छत्रपती संभाजीनगर -मुंबईचे तिकीटही याच दरात आहे. एरवी ही तिकीटे शनिवार, रविवार असला तरी ५०० ते ७०० च्या दरम्यान असतात. अशीच आणि यापेक्षाही भयंकर परिस्थिती अन्य मार्गांवर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सचीही आहे. काही दिवसांपूर्वी आरटीओकडून खासगी ट्रॅव्हल्सचालकांची अचानक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप तरी आरटीओ झोपेतून जागे झालेले नाहीत. त्‍यामुळे हम करे सो कायदा, असा पवित्रा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आहे. आरटीओच्या दुर्लक्षामागे मोठे अर्थकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणीमुळे प्रवाशांना मात्र झळ बसत आहे. दिवाळीत प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने याचा फायदा उचलला आहे.

प्रवाशांचा संताप
खासगी ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानी दरवाढीमुळे वैतागलेल्या प्रवाशांनी आरटीओच्या कारभाराबद्दल संताप व्यक्‍त केला आहे. दिवाळीचे मोठे गिफ्ट ट्रॅव्हलचालकांकडून आरटीओंना मिळाले का, असा सवाल त्यांनी केला आहे. खासगी ट्रॅव्हल्स आणि आरटीओंच्या आर्थिक हितसंबंधाचा सक्षम यंत्रणेने तपास करण्याची मागणीही होत आहे. राज्य सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणीही होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software