शेतात विद्युत पंप चालू करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, फुलंब्री तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : विहिरीवर विद्युत पंप सुरू करताना शॉक लागून शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (११ ऑक्‍टोबर) सकाळी ११ च्या सुमारास घडली.

बाळू मैनाजी ढेपले (३४, रा. पाल) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शेतात गहू पेरला असून, गव्हाला पाणी भरण्यासाठी सकाळी शेतात गेले होते. विहिरीवर विद्युत पंप सुरू करताना शॉक लागला. दुपारी दोनच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्याने शॉक लागल्याचे बघताच गावात कॉल करून कळवले. त्यानंतर ग्रामस्थांनी धावून ढेपले यांना तत्काळ फुलंब्री येथील सरकारी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. सायंकाळी ढेपले यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software