फुलंब्रीच्या देखण्या, धष्टपुष्ट ‘राजा’साठी मोजले ८२ लाख !; यापूर्वी ‘चिमण्या’ही ६४ लाखांत गेला होता!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तळेगाव वाडी (ता. फुलंब्री) येथील ‘राजा' नावाचा बैल तब्बल ८२ लाख रुपयांना विकला गेला असून, राज्याच्या शंकरपट क्षेत्रात एका बैलाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही या गावातील चिमण्या बैल ६४ लाखांत विकला गेला होता, हे विशेष. शाकेर मजीद खान आणि जाकेर मजीद खान (रा. तळेगाव वाडी) या भावंडाच्या मालकीच्या ‘राजा’ला पुण्यातील पृथ्वीदादा कुठवड व बाबूराव अप्पा कामठे यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) तळेगाव वाडी येथे येऊन खरेदी केले.

राजा तीन वर्षांचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची शंकरपटातील कामगिरी अव्वल आहे. हिंदकेसरी पुरस्कार विजेता असलेल्या राजाने मुंबई, पुणे, सांगली, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांतील स्पर्धांत सरस कामगिरी करून दाखवली. २ हिंदकेसरी, १२ हून अधिक पारितोषिके राजाने मिळवली असून, राज्यभर त्याची कीर्ती आहे. 

राजाचा आम्हाला अभिमान आहे. लहानपणापासून त्याला शंकरपटासाठी तयार केलं होतं. विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. खाण्या-पिण्यासह आरोग्याची विशेष काळजी घेतली.
- शाकेर खान
वडिलांना शंकरपटाची आवड असल्याने राजाला खरेदी केले असून, आगामी काळात राजा आमच्याकडून शंकरपटात सहभाग घेईल. आमचा व्यवसाय शेतीचा आहे.
- खरेदीदार पृथ्वी दादा कुठवड

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software