मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अचानक रिक्षाने धडक दिल्याने ॲक्टिवा मोपेडस्वार महिला जखमी झाली. ही घटना १९ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास मिलकॉर्नर पोलीस वसाहतीत घडली.

पूजा विजयकुमार पंडुरे (वय २५, रा. मिलकॉर्नर पोलीस वसाहत) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बेगमपुरा पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध शनिवारी (२१ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. जबाबानुसार, पूजा यांचे पती शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. १९ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास पूजा या ॲक्टिवा मोपेडने (MH 20 GM 8068) पोलीस आयुक्त मेन गेटकडून घरी पोलीस वसाहतीत येत असताना पोलीस वसाहतीतील मारुती मंदिरामागे रिक्षाने (MH 20 EF 8993) त्यांना अचानक धडक दिली. यात पूजा जखमी झाल्या. लोकांनी मदतीला धावून त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथून त्यांना २० मार्चला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक मालकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software