हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून हॉटेलचालकाने कामगारांसोबत मिळून हातगाडीवाल्या दोघांना बेदम मारहाण केली. यात हातगाडीवाले गंभीर जखमी झाले. ही घटना सिटी चौक परिसरातील कामाक्षी चौकात शुक्रवारी (२० मार्च) सायंकाळी घडली.

सय्यद सरवर हुसेन सय्यद कुरबान हुसेन (वय २३, रा. जैदी लेन, देवडी बाजार, छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. सरवर हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सरवर व त्याच्या काकाचा मुलगा सय्यद फरहान हुसेन यांनी ईदनिमित्त बॉम्बे ए वन तवा स्पॉट नावाच्या हॉटेलसमोर कामाक्षी चौकात पायपुसणीची हातगाडी लावली. शुक्रवारी (२० मार्च) सायंकाळी सव्वा चारला दोघे हातगाडी लावत असताना बॉम्बे ए वन तवा स्पॉट हॉटेलच्या मालकाचा मुलगा इकबाल अहेमद याने दोघांना हॉटेलमध्ये बोलावून शिवीगाळ करत, हॉटेलसमोर हातगाडी लावू नको, असे सांगितले. त्यावर सरवरने सांगितले, की तुमच्या दुकानासमोर हातगाडी लावली नाही. तुमच्या दुकानाच्या बाजूला आहे.  आम्ही फक्त आजच्या दिवसच हातगाडी लावत आहे, असे सांगितले.

त्यावर इकबाल याने शिवीगाळ करत सरवर व फरहान यांना हाताचापटाने मारहाण केली. सरवरचे काका त्याचवेळी तिथे आले. त्यांनाही इकबाल अहेमद व त्याचे वडील इरशाद अहेमद यांनी हाताचापटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इकबालने फावड्याच्या दांड्याने डोक्यात मारले. हातापायावर मारहाण केली. त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या चार ते पाच मुलांनीही लाकडी दांडे, कबाबची सिक घेऊन मारहाण केली. आमच्या नादी लागू नका. नाहीतर तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. हा सर्व राडा सुरू असताना तिथे पोलीस आले. त्यांनी भांडण सोडवून सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. इकबाल अहेमद व इरशाद अहेमद (दोन्ही रा. बुढीलाईन) व अन्य चार ते पाच जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software