केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्कुटीवरून उतरत असतानाच स्कूलबसने जोरात धडक दिल्याने महिलेसह त्यांच्यासोबतचा एक जण जखमी झाला. ही घटना चिकलठाण्यातील एचडीएफसी बँकेसमोर शुक्रवारी (२० मार्च) सकाळी ९ च्या सुमारास घडली.

मीराबाई नामदेव मासाळ (वय ४९, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यांनी जबाबात म्हटले आहे, की त्या सुनेसोबत राहतात. मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी ९ च्या सुमारास मीराबाई कामावरील मिस्तरींच्या स्कुटीवरून (MH 20 ET 2377) कामावर जात होत्या. चिकलठाणा येथील एचडीएफसी बँकेसमोर स्कुटीवरून उतरत असतानाच स्कूल बसने (MH 20 BT 4515) त्यांना धडक दिली. मीराबाई गंभीर जखमी झाल्या.

मिस्तरी बन्सी घोरपडे यांनादेखील उजव्या पायाला दुखापत झाली. लोकांनी मदतीला धावून दोघांनाही मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. तिथून मीराबाई यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. धडक देणारी स्कूलबस केम्ब्रीज शाळेची असल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी स्कूलबसचालक कृष्णा सुदाम वाहुळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर राऊत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software