कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीचे कारण शार्टसर्कीट सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने पूर्ण गोडाऊन कवेत घेतले. गोडाऊनमधील शेकडो नवीन रिक्षा, मालवाहू वाहने आगीत खाक झाली. धुराचे लोट, उंच उठणारे आगीचे लोळ आणि मध्ये मध्ये होणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले.

या ठिकाणी १०० हून अधिक नवीन एलपीजी रिक्षा उभ्या केलेल्या होत्या, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक गोडाऊनकडे धावले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्‍थळी धाव घेतली. गोडाऊनचे कर्मचाऱ्यांसह सर्वांनी मिळून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. अनेकांनी जिवाची बाजी लावून पेटत्या गोडाऊनमधून काही रिक्षा व मालवाहू बाहेर काढण्यात यश मिळवले. अग्निशमन दलाने माहिती मिळताच धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सायंकाळी सहापर्यंत बऱ्यापैकी आग आटोक्यात आली होती. आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्तलिहीपर्यंत समोर आलेले नाही. मात्र करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software