ईद मुबारकचे अनधिकृत फलक लावले, बेगमपुरा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ईद मुबारकचे अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दल महापालिकेच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात भाई इम्तेयाज, रफतयार खान यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी (२१ मार्च) दुपारी दीडला गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक गौतम कांबळे (रा. होनाजीनगर हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शनिवारी (२१ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास  गौतम कांबळे व स्वच्छता निरीक्षक बंडू साबळे शहरातील शुभेच्छा फलकांवर कार्यवाहीसाठी गस्त घालत असताना मिलकॉर्नर ते बारापुल्ला गेट दरम्यान दुभाजकावरील सरकारी खांबांवर अनधिकृतपणे शुभेच्छा फलक, बॅनर लावलेले दिसले. ईद मुबारक असे शुभेच्छा फलक भाई इम्तेयाज, रफतयार खान यांनी महापालिकेची परवानगी न घेता लावून महापालिकेच्या जाहिरात कराचे आर्थिक नुकसान करत शहराचे विद्रुपीकरण केले. त्यामुळे गौतम कांबळे यांनी बेगमपुरा पोलिसांत इम्तेयाज आणि रफतयार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी वाडेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software