इन्स्टाग्रामवर भांडण झालं, ‘रिअल’मध्ये वचपा काढला, १७ वर्षीय मुलासोबत घडली धक्कादायक घटना, सोशल मीडियावरूनच झाली होती ओळख, धूत हॉस्पिटलजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इन्स्टाग्रामवरच ओळख, इन्स्टाग्रामवरच भांडण, मात्र वचपा समोरच्याने प्रत्यक्ष भेटीला बोलावून काढला. १७ वर्षीय मुलाला वाढदिवसाचा केक कापायचा असल्याचे सांगत निर्जनस्थळी नेले आणि धमकावत लुटले. ही घटना सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धूत हॉस्पिटलजवळ रविवारी (२२ मार्च) रात्री १० च्या सुमारास घडली.

उस्मानपुऱ्यातील मिलिंदनगरात राहणाऱ्या सागरने (अल्पवयीन असल्याने नाव बदलले आहे) या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी (२२ मार्च) रात्री ९ च्या सुमारास तो घरी असताना इन्स्टाग्रामवर ओळख झालेला मित्र सार्थक भालेराव याने फोन करून सांगितले, की मी क्रांतीचौकात मिठाईच्या दुकानाजवळ आलो आहे. माझा जन्मदिवस आहे. आपल्याला केक कापायचा आहे. त्यानंतर सागर हा वडिलांची मोटारसायकल घेऊन क्रांती चौकात गेला. तेथे सार्थक भालेराव व त्याच्यासोबत राजन इंगोले होते. दोघे सागरला म्हणाले, की आपण मुकुंदवाडीत केक कापू. त्यानंतर तिघेही कांचन हॉटेलजवळ पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत धूत हॉस्पिटलजवळ म्हाडा कॉलनी येथे आले.

त्यांचे मित्र केक घेऊन येत आहेत, असे सांगून रात्री १० पर्यंत त्याला थांबवून ठेवले. त्यानंतर राजन इंगोले म्हणाला, की तू सार्थकला इन्स्टाग्रामवर शिवीगाळ का केली. त्यावर सागरने सांगितले, की त्यानेच मला अगोदर शिवीगाळ केली होती. त्यानंतर राजनने आनंदच्या कानातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी (किंमत ७ हजार ४०० रुपये) बळजबरीने काढून घेतली. सार्थकने मोबाइल (किंमत १० हजार रुपये) व चांदीचे ब्रासलेट हिसकावून घेतले. नंतर सागरच्या मोटारसायकलीचे सीट चाकूने फाडून नुकसान केले. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष सोनवणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान

Latest News

कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान कांचनवाडीजवळील पगारिया ऑटोच्या गोडाऊनला भीषण आग, शेकडो नव्या रिक्षा, मालवाहू वाहने खाक, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...
हॉटेलजवळ हातगाडी लावण्यावरून कामाक्षी चौकात राडा!; हॉटेलचालक-हातागाडीवाल्यांत हाणामारी, सिटी चौक भागातील घटना
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
घाटीजवळ मोठी कारवाई : स्कुटीच्या डिक्कीत आढळला नशेच्या गोळ्या, सिरपचा मोठा साठा! ड्रग्जतस्कराच्या मुसक्या आवळल्या, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
केम्ब्रीज स्कूलच्या बसने स्कुटीस्वार महिलेला उडवले, दोघे जखमी, चिकलठाण्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software