Career News : पाच वर्षांत एआय गिळंकृत करणार या १० नोकऱ्या!, तुम्ही या नोकऱ्या करत असाल तर वेळीच दुसरा पर्याय तयार ठेवा...
जर एखादे काम १०० लोक करत असतील तर २०३० पर्यंत फक्त ५९ लोक ते काम करतील. सर्वेक्षणानुसार, ८५% नियोक्ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना कौशल्यवान बनवण्याची तयारी करत आहेत. ७०% नियोक्ते अर्थात नियुक्ती करणारे म्हणतात की ते नवीन कुशल व्यक्तींना कामावर ठेवतील, तर ४०% लोक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास तयार आहेत. कारण जुन्या कौशल्यांची आता गरज नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या आगमनामुळे नोकरीच्या बाजारपेठेत खळबळ माजली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५ नुसार, तांत्रिक बदल, इकोनॉमिक फ्रेगमेशन, आर्थिक अनिश्चितता, लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि हरित परिवर्तन २०३० पर्यंत वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जागतिक कामगार बाजारपेठेत बदल घडवून आणू शकतात. जागतिक स्तरावर, एआय २२% नोकऱ्यांत बदल घडवून आणेल, ज्यामुळे ९२ दशलक्ष नोकऱ्या नष्ट होण्याची शक्यता आहे.
१. पोस्टल सर्व्हिस क्लर्क
२. बँक टेलर्स आणि संबंधित क्लर्क
३. डेटा एंट्री ऑपरेटर
४. कॅशियर आणि तिकीट क्लर्क
५. प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव
६. प्रिंटिंग आणि संबंधित ट्रेड वर्कर्स
७. अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क
८. स्टॉक-कीपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग क्लर्क
९. ट्रान्सपोर्टेशन अटेंडंट आणि कंडक्टर
१०. डोअर-टू-डोअर सेल्स वर्कर्स आणि न्यूज विक्रेते
एआयबद्दल चांगली गोष्ट
अहवालानुसार, २०२५ ते २०३० दरम्यान ९२ दशलक्ष (सुमारे ८%) नोकऱ्या गायब होण्याची अपेक्षा आहे. तथापि, सकारात्मक पैलू असा आहे की याच काळात अंदाजे १७० दशलक्ष (१४%) नवीन नोकऱ्या देखील उदयास येण्याची अपेक्षा आहे. जुन्या कौशल्यांची गरज नाहीशी होत असताना, नवीन कौशल्यांनी सुसज्ज असलेल्यांसाठी भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. नोकरीच्या बाजारात टिकून राहण्यासाठी तांत्रिक कौशल्ये शिकणे आवश्यक होईल. जे स्वतःला अद्ययावत ठेवतात तेच भविष्यात त्यांच्या नोकऱ्या टिकवून ठेवू शकतील.
कोणत्या नोकऱ्या टिकतील?
एआय आणि बिग डेटा हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या कौशल्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत, त्यानंतर नेटवर्क आणि सायबरसुरक्षा, तंत्रज्ञानाचे नॉलेज यांचा नंबर लागतो. २०३० पर्यंत तांत्रिक ज्ञानामुळे सर्जनशील विचारवंत, कायम अनुकूल व शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची मागणी वाढेल.

