सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना मंगळवारी (१० मार्च) रात्री दहाच्या सुमारास विश्वभारती कॉलनीत घडली.

पल्लवी कृष्णा टेहरे (वय २५, रा. शिवशंकर कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती कृष्णा व कुटुंबासह राहतात. त्यांचे पती सोन्याचे कारागीर आहेत. मंगळवारी (१० मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी पल्लवी आणि त्यांच्या सासू शोभा लक्ष्मण टेहरे (वय ५५) राहत्या घरातून ओंकारेश्वर मंदिराकडे पायी जात होत्या.

रात्री १० च्या सुमारास त्या जोधपूर स्वीटसमोर, विश्वभारती कॉलनीतून रोपळेकर चौकाच्या दिशेने जात असताना त्यांच्या समोरून मोटरसायकल दोघेजण आले. मागे बसलेल्याने अचानक पल्लवी यांच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने हिसकावले. नंतर सुसाट चेतक घोडा चौकाच्या दिशेने पळून गेले. पल्लवी यांनी आरडाओरड केल्याने त्याच रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारस्वाराने त्यांचा पाठलाग केला. मात्र ते जोरात निघून गेले. त्यांनी नेलेले गंठण १७ ग्रॅमचे असूनन, ९० हजार रुपयांचे आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest News

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software