चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका चोराने कमालच केली. कुल्फीची गाडी दुचाकीला बांधून चोरून नेत असताना त्याला गजानन कॉलनीत रंगेहात पकडण्यात आले. ही घटना आज, ११ मार्चला पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

शुभम हेमंत देवकर (वय ३०, रा. गजानननगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते दीपक सोनवणे यांच्या घरात कुटूंबासह किरायाने राहतात. कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. कुल्फी विकण्याची बासुरी गुळाची कुल्फी नावाची गाडी रिलायन्स मॉलच्या बाजूला लावतात. मंगळवारी (१० मार्च) रात्री ११ च्या सुमारास कुल्फीची गाडी बंद करून घरी गेले. बुधवारी (११ मार्च) पहाटे अडीचला (मध्यरात्री) त्यांना जाग आली. त्यांच्या कुल्फीच्या गाडीला साखळीचा लॉक लावायचे ते विसरून गेल्याने गाडीकडे आले.

त्यावेळी स्वामी समर्थ कमानीसमोर, रिलायन्स मॉल रोड गजानन कॉलनी येथे एक जण त्यांची कुल्फीची गाडी दोरीने हिरो मोटारसायकलीला (MH 20 GW 3212) बांधून घेऊन जात होता. तो पूर्वी देवकर यांच्या कुल्फीच्या गाडीच्या बाजूलाच त्याची मसाला दुध विक्री करण्याची गाडी लावत होता. त्याचे नाव स्वप्निल बबनराव शिर्के (वय २९, रा. गुरुदत्त नगर) असल्याचे देवकर यांना कळले. त्याला देवकर यांनी पकडून मोटारसायकलीसह पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी शिर्केविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दादाराव राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest News

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software