शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शाळेच्या आवारात खेळत असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत समोर आला आहे. बुधवारी (११ मार्च) मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संभाजी शिंदे असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारीला सकाळी शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनी खेळत होती. शिक्षक संभाजी शिंदे याने कुणी पाहत नसल्याची संधी साधून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. ही बाब मुलीने कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने पैठण एमआयडीसी पोलिसांत बुधवारी तक्रार दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप करीत आहेत. घटना २६ फेब्रुवारीला घडली असताना, तक्रार १५ दिवसांनी का करण्यात आली, याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest News

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software