SIDE STORY : कागदाचा छोटासा तुकडा, जिभेवर ठेवला की ‘उडता औरंगाबाद’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज तस्करीचा नवा अध्याय, जगातील शक्तीशाली ड्रग्ज शहरात

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ज्या ड्रग्जच्या सेवनानंतर अवघ्या १५ मिनिटांत व्यक्ती आभासी जगात जातो... जगभरातील सर्वात शक्तीशाली ड्रग्जपैकी एक, ज्याला भारतात बंदी आहे, छोटे छोटे कागदाचे तुकडे, त्यावर आकर्षक डिझाइन, जे जिभेवर ठेवताच लाळेतून थेट रक्तात मिसळते अन्‌ मेंदू-मनावर दीर्घकालीन परिणाम होतो... असे एलएसडी (LYSERGIC ACIDE DI ETHYLAMIDE) ड्रग्ज छत्रपती संभाजीनगरात एका तस्कराकडे आढळल्याने शहर पोलिसांची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोहीम उघडली आहे. पाळेमुळे खोदणे सुरू आहेत. पण ही कीड समूळ नष्ट करणे किती अवघड झाले आहे, याची प्रचिती आता हे ड्रग्ज आढळल्यानंतर पोलिसांनाही आली असावी. ज्याच्याकडे हे ड्रग्ज आढळले तो चक्क इंजिनिअरिंगचा विद्यार्थी निघाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मारुफ अहमद कादरी (वय २५, रा. आरेफ कॉलनी) असे त्याचे नाव. शहरातील प्रसिद्ध कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तो काही महिने दुबईला राहिला. आता काही दिवस छत्रपती संभाजीनगर तर काही दिवस पुण्यात राहतो. जगातील सर्वात शक्तीशाली ड्रग्जपैकी एक असलेल्या एलएसडीची विक्री तो शहरातील हायप्रोफाइल पार्ट्या, हायप्रोफाइल तरुण-तरुणींना करतो.

कुठे पकडला गेला?
गुरुवारच्या (२ ऑक्‍टोबर) रात्री आठला बिबी का मकबराच्या तिकीट खिडकीजवळ मारुफला अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने पकडले. त्‍याच्याकडून ५० हजार रुपयांचे ड्रग्ज आणि ५० हजार रुपयांचा आयफोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक सापळा लावून थांबले होते. मारुफ येताच त्याच्यावर झडप घातली. अंगझडतीत पॅन्टच्या खिशात प्लास्टिकची पिशवी मिळून आली. त्यात १० छोट्या पारदर्शक प्लास्टिकच्या पुड्या होत्या. प्रत्येक पुडीत एक कागदाचा तुकडा होता. तो कागदाचा तुकडा म्हणजे एलएसडी हा अंमलीपदार्थ असल्याचे मारुफने पोलिसांना सांगितले. मारुफविरुद्ध पोलीस अंमलदार लालखान पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार लालखान पठाण, संदिपान धर्मे, सतीश जाधव, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे यांनी केली. मारुफला न्यायालयात हजर केले असता ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

०.०१ ग्रॅम ड्रग्ज ३ ते ५ हजारांत...
एलएसडी ड्रग्जची किंमत ०.०१ ग्रॅमला ३ ते ५ हजार इतकी आहे. पुण्यात नोकरीला असता मारुफ ड्रग्जच्या आहारी गेला. तो आता पुण्यावरून ड्रग्ज शहरात आणून विकतो. शहरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पोलीस मारुफच्या मागावर असल्याचे सांगण्यात येते. पर्यटकांपर्यंत हे ड्रग्‍ज सहज पोहोचविण्याचा त्याचा प्रयत्न दिसून येतो.

काय आहे एलएसडी ड्रग्ज?
एल.एस.डी. (LSD - Lysergic Acid Diethylamide) हे एक सायकॅडेलिक ड्रग्ज आहे. याचा वापर केल्यावर माणसाच्या विचारांमध्ये, भावना व जाणिवांमध्ये मोठा बदल होतो. यामुळे व्यक्तीला वास्तव जग वेगळ्या पद्धतीने दिसू व जाणवू लागते. १९३८ मध्ये अल्बर्ट होफमन यांनी स्वित्झर्लंडमध्ये सँडोज या कंपनीत हे ड्रग्ज तयार केले. ते धान्यावर वाढणारा बुरशीपासून तयार केले जाते. ते साधारणपणे रंगहीन, वासहीन आणि चवीला थोडं कडसर असतं. लहान कागदाचे तुकडे ज्यावर हे ड्रग्ज शिंपडलेले असते, द्रव, कॅप्सूल किंवा गोळ्या या स्वरूपातही वापरले जाते. वापरल्यावर साधारण १५-२० मिनिटांत परिणाम जाणवतो आणि ८ ते १२ तास टिकू शकतो. त्याच्या सेवनानंतर व्यक्ती भ्रमीत होतो. तीव्र भावनिक बदल त्याच्यात होतात. हृदयगती वाढते, रक्तदाब बदलतो. घाम येणे, थरथर, भूक कमी होणे, झोप न लागणे अशा समस्या नंतर उद्‌भवतात. भीती, घबराट, संशय, भयानक दृश्ये दिसू लागतात. LSD ला भारतात व जगातील बहुतांश देशांमध्ये बंदी घातलेले आहे. याचा ताबा ठेवणे, विक्री करणे किंवा सेवन करणे हे NDPS Act (India) अंतर्गत गंभीर गुन्हा आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software