- News
- जिल्हा न्यूज
- भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने बहिणीनेही सोडले प्राण!, छत्रपती संभाजीनगरची घटना
भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने बहिणीनेही सोडले प्राण!, छत्रपती संभाजीनगरची घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील न्यू हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय अंबादासराव राऊत (वय ७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (१३ नोव्हेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का मोठी बहीण प्रयागबाई राधाकृष्ण जाधव (वय ८२, रा. आनंदस्वामी मठामागे, जालना) यांना सहन झाला नाही. त्यांनीही प्राण सोडले. लागोपाठ झालेल्या दोन मृत्यूंमुळे राऊत व जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दत्तात्रय राऊत हे दीड वर्षापासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. गुरुवारी करमाड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भावाच्या विरहाचा धक्का सहन न झाल्याने बहीण प्रयागबाई यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकाच दिवशी बहीण- भावाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत होत आहे. दत्तात्रय राऊत यांच्यावर करमाड येथे तर जालना येथे प्रयागबाई जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

