पित्राचे जेवण करून शेतात आले, जनावरांना पाणी पाजण्यासाठी शिवना नदीकाठी आले, त्‍याचवेळी काळाने घातली झडप!, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

देवगाव रंगारी (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लव्हाळी (ता. कन्नड) येथील ४० वर्षीय शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शिवना नदीकाठी गेले असता शेवाळलेल्या जागेवर पाय घसरून नदीपात्रात पडले. यातच त्‍यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर)  दुपारी चारच्या सुमारास घडली.

भारत रावसाहेब डगळे (वय ४०, रा. लव्हाळी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत डगळे दुपारी पित्राचे जेवण करून शेतात एकच्या सुमारास गेले होते. शेतातील चरत असलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेजारी शिवना नदीकाठी आले. शेवाळलेल्या व निसरड्या जागेवर त्यांचा पाय घसरला. ते खोल प्रवाही पाण्यामध्ये बुडाले. आजूबाजूला कोणीही नसल्याने काही मदत मिळण्याअगोदरच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, इतर नातेवाईकांनी बराच वेळ झाला भारत का आले नाही म्हणून शिवना नदीकाठी शोध घेतला असता त्यांना थोडे अंतरावर भारत डगळे यांचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी शिवना नदी काठी धाव घेतली. भरत डगळे यांना देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश आहिरराव व वैद्यकीय अधिकारी  डॉ. श्रीमती शेख यांनी तपासून मृत घोषित केले.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री सातच्या सुमारास लव्हाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डगळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी डगळे कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software