अश्लील शिवीगाळीने इतका राग वाढत गेला, की तिला एकटे पाहून डोक्यात दगड घालून खून केला!; शेकट्यातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या LCB ची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रोज रोजच्या अश्लील शिवीगाळीने वैतागलेल्या मेंढपाळाने शेतकरी वृद्ध महिलेचा डोक्यात दगड घालून खून केला. २१ फेब्रुवारीला वृद्धेचा मृतदेह आढळला होता. गुरुवारी (२६ फेब्रुवारी) या खुनाचे गूढ उकलण्यात छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. खुन्याला अटक करून करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेकट्यातील या खुनाची कहानी...

२१ फेब्रुवारीला करमाड पोलिसांना माहिती मिळाली होती, की शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील शेतात वृध्देचा मृतदेह आढळला आहे. करमाड पोलिसांसह पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. या वृद्धेचा डोक्यात दगड मारून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आल्याचे दिसून आले. या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मागर्दर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. खून झालेल्या वृद्धेचे नाव सुंदराबाई नामदेव जाधव (वय ७५, रा. शेकटा) असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत सुंदराबाईंचा मुलगा संजय (वय ५१) यांच्या तक्रारीवरून करमाड पोलिसांनी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेची ३ पथके व करमाड पोलिसांचे एक पथक अशी ४ पथके गुन्ह्याच्या तपासाला लागली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. आजूबाजूचा पूर्ण भाग पिंजून काढला. शेकटा गावात, शेतवस्तीवर गुप्त बातमीदार नेमून माहिती घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. अखेर गुरुवारी (२६ फेब्रुवारी) पोलिसांना आशेचा किरण गवसला. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून कळले, की घटनेच्या दिवशी २१ फेब्रुवारीला मेंढपाळ दारकुबा बालाजी भाऊले (रा. लाडसावंगी) हा तेथे हजर होता. तो नेहमी त्या परिसरातच मेंढ्यांना घेऊन फिरत असतो. पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घेतला असता कळले, की बाळू श्रीरंग बुचडे (रा. शेवगा) यांच्याकडे मेंढ्या सांभाळण्यासाठी असलेला दारकुबा २ दिवसांपासून कामाला आलेला नाही, गावी निघून गेला आहे. पोलिसांनी त्याला गोलटगाव येथून त्याच्या नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले. करमाड पोलीस ठाण्यात त्याला आणून कसून चौकशी करण्यात आली.

त्याने सांगितले, की सुंदराबाई नेहमी मला माझ्या शेतात मेंढ्या का चारतो, माझ्या शेताकडे मेंढ्या चारण्यासाठी आणायच्या नाहीत, असे म्हणून शिवीगाळ करत होती. त्यामुळे मला तिचा खूप राग आलेला होता. २१ फेब्रुवारीलाही तिने शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने मी तेथील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलो असता ती बोरीच्या झाडाखाली दिसली. त्याठिकाणी कोणीही नसल्याने शेतातील बाजूला पडलेला मोठा दगड घेऊन मी त्या बाईच्या डोक्यात टाकून तिला जीवे मारले, असे सांगितले. करमाड पोलिसांनी त्याला अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस अंमलदार कासीम शेख, प्रमोद पाटील, विष्णू गायकवाड, सचिन राठोड, विठ्ठल डोके, सुनिल गोरे, गोपाल पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, राहुल गायकवाड, सनी खरात, बलवीर बहुरे, संजय तांदळे, शिवाजी मगर, नीलेश कुडे, संदीप कोळगे, योगेश तरमळे, जीवन घोलप तसेच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे, सोपान डकले, सुनिल लहाने, संतोष चव्हाण यांनी केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software