धारदार चाकू घेऊन माजवत होता दहशत, पोलिसांनी घातली झडप!, शिवाजीनगरात जवाहरनगर पोलिसांची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धारदार चाकू घेऊन शिवाजीनगर परिसरात दहशत माजवत असलेल्या तरुणाला जवाहरनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी (२२ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

शिवाजीनगर परिसरात जवाहरनगर बिट मार्शल-१ चे पोलीस अंमलदार मारोती गोरे हे गस्त घालत होते. त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जंबुरे हॉस्पिटलजवळ एक तरुण लोकांत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारदार लोखंडी चाकू घेऊन फिरत आहे. श्री. गोरे यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना कळवली. त्यानंतर सहायक फौजदार श्री. नलावडे आणि श्री. गोरे यांनी जंबुरे हॉस्पिटलकडे धाव घेतली. संशयित तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्याला काही अंतरावरच पकडले.

त्याला ताब्यात घेऊन नाव, गाव विचारले असता दीपक उर्फ यश सचिन साळवे (वय १८, रा. इंदिरानगर नुरी मशिदीजवळ गारखेडा परिसर) असे त्याने सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला धारदार चाकू मिळून आला. खिशात मोबाइल मिळून आला. मोबाइलबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी ५०० रुपयांचा चाकू, १५ हजारांचा मोबाइल जप्त केला. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कसून चौकशीत दीपकने मोबाइल इंदिरानगर परिसरातून हिसकावल्याची कबुली दिली.

२१ फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास रामेश्वर उत्तम आढाव (रा. इंदिरानगर गारखेडा परिसर) घराबाहेर बसलेले असताना त्यांच्या हातातील विवो कंपनीचा मोबाइल दीपकने हिसकावून पळ काढला होता. दीपकला पकडण्याच्या कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट मार्शलचे सहायक फौजदार श्री. नलावडे व पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी केली. अधिक तपास सहायक फौजदार श्री. ठोंबरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software