- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरकरांना १५ दिवसांत मिळू शकते दोन दिवसांआड पाणी; पण सारे काही कंत्राटदारांच्या हाती;
छत्रपती संभाजीनगरकरांना १५ दिवसांत मिळू शकते दोन दिवसांआड पाणी; पण सारे काही कंत्राटदारांच्या हाती; हायकोर्ट घेणार ६ मार्चला आढावा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुढील १५ दिवसांत जॅकवेलमधून २०० एमएलडी पाण्याचा उपसा होऊ शकेल. त्यातील ८८ टक्के म्हणजेच १७६ एमएलडी पाणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला मिळू शकेल. त्यातील ८० टक्के पाण्याचा पुरवठा दर दोन दिवसांआड शहरवासीयांना होऊ शकतो. अर्थात, या साऱ्यासाठी कंत्राटदारांना कसोशीचे प्रयत्न करावे लागतील, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला दिली.
महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, कंत्राटदार आणि सर्व संबंधितांसह ६ मार्चला पुन्हा जॅकवेलला भेट देऊन पाहणी करावी. आज सादर झालेल्या अहवालापैकी किती कामे पूर्ण झाली, याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करावा आणि त्यात पाणी उपशासाठी येत असलेल्या अडचणी व त्यावरील उपाय याचाही उल्लेख करावा, असे निर्देश खंडपीठाने यावेळी दिले.
उच्च नायायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी खंडपीठाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या अनुषंगाने केलेल्या कामांचा उल्लेख आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने जॅकवेलच्या तळाची स्वच्छता पूर्ण केली असून, बहुतेक गळती थांबविण्यात आली आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. भिंतींमधील लोखंडी सळ्या कापण्याचे काम अग्निशमन दलाच्या पथकाच्या साह्याने सुरू आहे. सेक्शन ‘ए’मधील जिन्याचे काम अजून झालेले नाही. त्यामुळे ते असुरक्षित आहे. सेक्शन बी आणि सी चे काम प्रगतिपथावर आहे. वीज पुरवठ्यासाठी महावितरणसोबत महापालिकेचा करार झाला असून, पुढील दोन दिवसांत हा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे या अहवालात म्हटले आहे. सध्या कामावर केवळ २० मजूर असून, संख्या वाढविणे आवश्यक आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी साधारण ३ ते ४ आठवडे लागतील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
By City News Desk
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
By City News Desk
Latest News
27 Feb 2026 22:02:11
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...

