अंबानींच्या सुनेच्या वाढत्या वाऱ्यांमुळे पैठण एमआयडीसीला महत्त्वाकांक्षांचे पंख..., राधिका मर्चंट-अंबानींना पाहण्यासाठी उसळली गर्दी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या औद्योगिक विकासाला नवे पंख मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. याचे कारण देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाचे या औद्योगिक वसाहतीकडे वळलेले लक्ष हे आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या संचालिका राधिका मर्चंट- अंबानी यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) अचानक पैठण एमआयडीसीला भेट दिली. राधिका यांनी गेल्या तीन महिन्यांत येथे दिलेली ही दुसरी भेट आहे, हे विशेष..

पैठण एमआयडीसीमध्ये असलेल्या इनकोअर हेल्थकेअर कंपनीच्या राधिका मर्चंट-अंबानी या संचालिका आहेत. गुरुवारी त्या अचानक या कंपनीला भेट देण्यासाठी येथे आल्या. सकाळी १०.३० वाजता राधिका मर्चंट-अंबानी यांचे हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांचे वडील हिरेन मर्चंट हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून कडक बंदोबस्तात त्या एमआयडीसीतील इनकोअर हेल्थकेअर कंपनीकडे रवाना झाल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत कंपनीचे तज्‍ज्ञ, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी देखील होते.  तेथे पोहोचल्यावर त्यांनी कंपनीच्या विविध विभागांना भेटी देत उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रकल्पाच्या भविष्यातील विस्तार योजनांच्या अनुषंगाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 
दुसरी भेट 
याआधी राधिका मर्चंट-अंबानी यांनी १ व २ डिसेंबर २०२५ रोजी इनकोअर हेल्थकेअर प्रकल्पाला भेट दिली होती. त्याला काही दिवस उलटत नाही तोच त्या पुन्हा या प्रकल्पाला भेट देण्याच्या हेतूने पुन्हा येथे आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा या प्रकल्पाच्या भेटीसाठी आल्याने त्यांनी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिल्याची चर्चा असून, त्यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे पैठण एमआयडीसीमध्ये मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार वाढीचे संकेत मिळाल्याचे मानण्यात येत आहे. दरम्यान, राधिका मर्चंट-अंबानी यांच्या आगमनाची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी त्यांना पाहण्यासाठी संत एकनाथ  साखर कारखाना परिसरात मोठी गर्दी केली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software