महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच हातगाडीवाल्यांचा पुन्हा ‘शहागंज’वर ताबा!; थातूरमातूर कारवाईने काय होणार, तिथेच ठाण मांडून बसा!!, सामान्यांची मागणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी ११:३० ला शहागंज चमन भागात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडीवाल्यांना हटविण्यासह, छोटी मोठी अतिक्रमणे बुलडोझरने उद्‌ध्वस्त केली. पथक येताच एरवी मुजोरीचा कळस करणारे हातगाडीवाले गल्लीबोळांत धूम ठोकताना दिसले. चमनच्या आसपास आणि क्लॉक टॉवर येथील चप्पल गल्लीतील ३० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर बुलडोझर चालला. कारवाई करून पथक जाताच दुपारी अडीचनंतर पुन्हा हातगाडीवाल्यांनी रस्ता व्यापल्याचे दुर्दैवी चित्र दिसले. त्यामुळे ते आता कारवाईलाही जुमानत नसल्याचे दिसून आले. शहागंज मशीद रोड, हिंदी भवन रोड, किराणा चावडीकडे जाणारा रस्ता हातगाडी चालकांनी ताब्यात घेतला होता. एवढेच की रोज बेशिस्त पद्धतीने हातगाड्या लागतात, गुरुवारी त्यात थोडी शिस्त दिसली...

बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी चारच्या सुमारास शहागंज चमन येथे ४ हातगाडी चालकांनी दाम्पत्याला अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे शहरभर संतप्त प्रतिक्रिया उमटली. सिटी चौक पोलिसांनी शेख सोहेल बशीर, आदिल कय्युम शेख, इम्रान बशीर शेख, शहबाज शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिंदे गटाचे नेते, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या घटनेला गांभीर्याने घेत वर्षानुवर्षे शहागंजमध्ये हातगाडीवाल्यांच्या वाढलेल्या मुजोरीला लगाम घालण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना त्यांनी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना केली. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाला सकाळी ११ वाजता बोलावण्यात आले.

या विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह वॉर्ड अधिकारी, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद आदींनी सकाळी ११:३० वाजता शहागंज गाठले. पथक आल्याचे पाहून हातगाडीवाले दिसेल तिकडे पळताना दिसले. त्यामुळे ते पथकाच्या हाती लागले नाहीत. १०० हून अधिक हातगाडी चालकांनी धूम ठोकी. त्यानंतर मनपाच्या पथकाने चमनसमोरील एका फळ विक्रेत्यावर कारवाई केली. त्याचे बरेच सामान रस्त्यावर आले होते. चप्पल गल्लीतील व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर शेड उभारल्या होत्या. ३० पेक्षा अधिक शेड मनपाने काढल्या. त्यामुळे रस्ता मोकळा झाला. मात्र पथक निघून जाताच पुन्हा हातगाडीवाल्यांनी शहागंजवर कब्जा केल्याने महापालिकेच्या पथकाने आता या ठिकाणी तळ ठोकण्याची गरज निर्माण झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software