छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेंट्रल एक्ससाइज ऑफिसमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे घर चोरट्यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान फोडले. जवळपास ५ तोळे सोने चोरीला गेले. या सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत केली तर ते ८ लाखांहून अधिक रुपयांचे भरते. जुने सोने पकडले आणि अर्ध्या किमतीचे धरले तरी ६९ हजार रुपये किंमत भरत नाही. तरीही प्रत्‍येक चोरीच्या दागिन्यांची किंमत कवडीमोल लावून अवघी ६९ हजार २७५ रुपयांची चोरी दाखविण्यामागे काय गौडबंगाल आहे, अशी चर्चा होत आहे.

लक्ष्मीकांत भास्करराव पाचपोर (वय ६०,रा. सुयोग अपार्टमेंट समाधान कॉलनी जिल्हा न्यायालयामागे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा पुण्यात शिकतो. ते सेवानिवृत्त आहेत. बुधवारी (२५ फेब्रुवारी) ते व त्यांची पत्नी मुलगा श्रीरंगला भेटण्यासाठी घर बंद करून पुण्याला गेले होते. फ्लॅटसमोरील फ्लॅट क्र. ४ मध्ये राहणाऱ्या महिलेने त्यांना रात्री साडेआठला फोन करून सांगितले, की तुमच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसत आहे. त्यामुळे पाचपोर यांनी तातडीने वेदांतनगर पोलिसांना कळवले. चोरीची घटना २५ फेब्रुवारीला दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान कधीतरी घडली होती.

पाचपोर हे गुरुवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले. त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. लोखंडी कपाटाचे दार वाकवून तोडलेले दिसले. कपाटातील ३० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम, अडीच ग्रॅम आणि ७५० मि.ली. ग्रॅम असे सोन्याचे ३ शिक्के, ४ ग्रॅमचे सोन्याचे कानातले, १० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, २ ग्रॅमच्या सोन्याच्या कानातल्या बाळ्या, २१ ग्रॅम चांदीचे ४ शिक्के, ५० ग्रॅमचा चांदीचा पेला, ३८ हजार रुपये रोख असा एकूण ६९ हजार २७५ रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. दीपाली श्रीपाद देशपांडे यांचाही फ्‍लॅट फोडून चोरट्यांनी २ हजारांची चांदीची साखळी, ४५ हजार रुपये रोख असा एकूण ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुपे करत आहेत.

अभिषेक अपार्टमेंटमध्येही चोरी... 
बुधवारी दुपारी याच काळात चोरट्यांनी वेदांतनगरातील अभिषेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रिती ज्ञानेश्वर शिंदे-गायकवाड यांचा फ्‍लॅट फोडला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील १ लाख ४९ हजार रुपयांची चोरी केली आहे. त्यांच्या सासू मंदाकिनी व सासरे तुळशीराम गायकवाड हे नेवासा फाटा येथे कार्यक्रम असल्याने गेले होते. बुधवारी दुपारी साडेबाराला त्या कार्यालयात गेल्या. दुपारी तीनला मुलाची स्कूल बस येत असल्याने त्या त्याला घेऊन घरी आल्या. फ्‍लॅटचा दरवाजा तुटलेला दिसला. सामानाची फेकझोक केलेली होती. चोरट्याने ७० हजारांची दीड तोळे सोन्याची बांगडी, ३० हजारांची ७ ग्रॅमची अंगठी, ३५ हजार रुपयांची १ हिऱ्याची अंगठी, ५ हजार रुपयांचे चांदीचे पैंजण व जोडवे, ९ हजारांची दोन घड्याळे चोरट्याने चोरून नेली होती. प्रिती गायकवाड यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात चोरटे कैद झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software