१७ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, दुपारी २ ला लहान भाऊ शाळेतून घरी आला अन्‌ समोरील दृश्य पाहून जिवाच्या आकांताने ओरडला!, सिल्लोडच्या ‘या’ गावातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास शिरसाळा (ता. सिल्लोड) येथील शेतवस्तीवर समोर आली. रुपाली विठ्ठल शेळके असे मुलीचे नाव आहे.

रुपाली आई-वडील, लहान भावासह राहत होती. गुरुवारी सकाळी दहाला तिचे आई-वडील शेतात कामाला गेले. लहान भाऊ शाळेत गेला. सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान घरी कोणी नसताना रुपालीने छताच्या पाइपला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. दुपारी दोनला तिचा भाऊ शाळेतून घरी आला असता त्याला रुपालीने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. रुपालीला अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली, हे अद्याप समोर आलेले नाही. अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, तपास सहायक निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सांडू जाधव करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!

Latest News

सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात! सचिन घायाळांकडून १६ कोटींचा महाघोटाळा!; ‘संत एकनाथ'ची सामग्री गहाण ठेवून ३० कोटींचे कर्ज घेतले अन् त्यातील १६ कोटी ढापले; गुन्हा दाखल; कर्ज देणारी ‘बुलडाणा अर्बन'ही गोत्यात!
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...
पिसादेवीच्या पारदेश्वर मंदिराजवळ थरार : बारावीतील ३ विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूचे पोटात वार, अन्य शस्‍त्राने डोके फोडले
छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त करवसुली अधिकाऱ्याचे घर फोडले, ५ तोळे सोने गेले, FIR मध्ये नोंद अवघ्या ६९ हजारांची!, सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८ लाखांहून अधिक!!
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software