बाजारसावंगीत खळबळ : बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : खुलताबाद तालुक्‍यातील बाजार सावंगी येथील ३६ वर्षीय विजय रामराव नलावडे हे राहत्‍या घरातून रविवारी (१४ सप्‍टेंबर) बेपत्ता झाले होते. खुलताबाद पोलीस शोध घेत असतानाच मंगळवारी (१६ सप्‍टेंबर) दुपारी त्‍यांचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळला.

गावाजवळील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विहिरीत पाहणी केली, तेव्हा विजय यांचा मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी माहिती देताच पोलीस अंमलदार संजय सपकाळ, दिलीप बनसोड, संतोष पुंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. नलावडे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software