सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड पंचायत समितीवर भाजपने भगवा फडकवला आहे. भाजप प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश बनकर यांची सभापतिपदी, तर भगवान शेनफड आहेर यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे. भाजपने १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव केला.

मंगळवारी सकाळी ११:४५ वाजता सभापती आणि उपभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्या अनिता बनकर आणि शिंदे गटाच्या सुरेखा शिंदे यांनी सभापतिपदासाठी, तर उपसभापतिपदासाठी भाजपचे भगवान आहेर आणि शिंदे गटाचे निजामखा पठाण यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोनला विशेष सभा होऊन लगेचच १८ सदस्यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना १० मते तर शिंदे गटाच्या उमेदवारांना ८ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी दुपारी तीनला विजयाची घोषणा केली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवारात जल्लोष सुरू केला. फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयामुळे सिल्लोडच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येते. ही आ. अब्दुल सत्तार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सभापती, उपसभापती निवडणुकीत आ. सत्तार यांनी काहीतरी चमत्कार घडवून आणतील, अशी चर्चा होती. मात्र तसे घडविण्याचा धोका सत्तारांनी पत्करला नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software