शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चप्पल ठेवण्याच्या रॅकमध्ये चावी ठेवून ड्युटीला जाणे डॉक्टरला चांगलेच महागात पडले. चोरट्याने ती चावी घेऊन घरातून १ लाख ८० हजार रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारला. ही घटना शनिवारी (७ मार्च) दुपारी सुराणानगरात समोर आली. जिन्सी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अभिषेक राजेश रानडे (वय २५, रा. सुराणानगर, किया शोरूमजवळ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते व त्यांचे मित्र डॉ. कुंदन जाजू हे संगिता जोशी फ्लॅट किरायाने घेऊन राहतात. अभिषेक व कुंदन एमजीएम हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतात. शुक्रवारी (६ मार्च) रात्री १० ला कुंदन एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले. अभिषेक एकटे फ्लॅटमध्ये झोपलेले होते. शनिवारी (७ मार्च) सकाळी ८ च्या सुमारास ते फ्लॅटला कुलूप लावून चप्पल ठेवण्याच्या रॅकमध्ये चावी ठेवून एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले.

दुपारी पावणेदोनला ते परतले असता त्यांच्या ५ घड्याळ व कुंदन यांच्या ४ घड्याळ व अॅपल कंपनीचा आयपॅड व पॉकेटमध्ये ठेवलेले ५ हजार रुपये कुणीतरी चोरून नेल्याचे दिसले. त्यांनी कामवाल्या बाईला कॉल करून विचारले असता त्यांनी सांगितले, की मी घर उघडले तेव्हा कपाट उघडे होते. त्यात आयपॅड नव्हते. कोणीतरी चोरट्याने चप्पल ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवलेली चावी घेऊन फ्लॅटचे कुलूप उघडून एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास पोलीस निरीक्षक गौतम वावळे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software