पडेगावच्या श्री साईबाबा महिला पतसंस्था अध्यक्षा, उपाध्यक्षांना बेड्या!; ठेवीदारांना ५० लाखांनी फसवल्याचे प्रकरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव येथील श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे व उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र मस्के यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर ठेवीदारांची ५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (१८ नोव्‍हेंबर) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

श्री साईबाबा महिला पतसंस्थेची शाखा दीड वर्षापूर्वी लासूर स्टेशन येथील गीताबनमध्ये सुरू करण्यात आली होती. शाखेत साईनाथ रामराव बनकर (रा. बाभूळगाव नांगरे, ता. गंगापूर) यांनी १० लाख,  केदारनाथ नारायण गायकवाड यांनी ७ लाख, ज्ञानेश्वर लक्ष्मण बनकर यांनी ५ लाख, ज्ञानदेव बनताना यांनी १० लाख. उन्नती अरविंद कुलकर्णी यांनी ६ लाख, मनिषा वसंतराव जोशी यांनी ५० हजार, पूजा ज्ञानेश्वर शिंदे यांनी ५ लाख, चंद्रकला सूर्यभान वाकळे यांनी २ लाख अशा सर्वांनी मिळून ५० लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. मुदत संपूनही ठेवी परत देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ केली जाऊ लागल्याने ठेवीदारांना शंका निर्माण झाली. अखेर साईनाथ बनकर यांनी २९ जूनला शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे व उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र मस्के (दोघीही रा. प्लॉट नं. २ सुंदरनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या लासूर स्टेशन भागात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. गुरुवारी दुपारी ३:३० वाजता पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. त्यांना शुक्रवारी गंगापूर सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस अंमलदार दीपेश नागझरे, जितेंद्र बोरसे, महिला पोलीस अंमलदार आर. एल. मंचुके, पोलीस चालक अंमलदार अजिनाथ तिडके यांनी केली.

या प्रकरणात शिल्लेगाव पोलिसांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात अध्यक्षा उषा मोरे, उपाध्यक्षा सुशीला म्हस्के, मुख्य व्यवस्थापक गणेश रामहरी मोरे, सचिव सौ. गंगासागर अप्पासाहेब शेजवळ, संचालिका सविता गोकुळ मोरे, सरिता रामकिसन म्हस्के, गीता चंद्रकांत चव्हाण, कविता विष्णू सुरडकर, सुजाता सतीश शेरखाने, मंजूश्री दगडू कावळे, पार्वती गणेश रवीवाले, कल्पना नरसिंह माळी, धनश्री योगेश म्हस्के, शीतल रामनाथ नरोडे, रंजना आजिनाथ मोरे, हिराबाई विलास सौदागर, पल्लवी अशोक आघाव, पूजा आदिनाथ नवले, लासूर स्टेशनचे शाखा व्यवस्थापक बळीराम गोरखनाथ मोरे, मुख्य प्रमोटर भरत रामहरी मोरे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या

Latest News

ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर/पैठण/वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यासोबतच गरवारे कंपनीतही नोकरी करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजीगर शहराजवळील चौका...
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software