दुभाजकामधून वळण घेताना स्मार्ट सिटी बसने दुचाकीला उडवले, एक ठार, एक गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्मार्ट सिटी बसने रस्‍त्‍याच्या कडेला उभ्या दुचाकीस्वारांना उडवले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. बस दुभाजकामधून वळण घेत असताना ही दुर्घटना जालना महामार्गावर शेकटा येथील कोकाटे पेट्रोलपंपासमोर सोमवारी (८ सप्‍टेंबर) सकाळी साडेनऊला घडली.

आदिल मुनीर शहा (वय २०, रा. कौडगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव असून, तो बांधकाम मजूर होता. हमीदखाँ शेरखाँ पठाण (वय ३२, रा. कौडगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. हमीदखाँसुद्धा बांधकाम मजूर आहे. छत्रपती संभाजीनगरकडून स्मार्ट सिटी बस (क्र. एमएच २०, ईएल २८०८) आली. शेकटा येथील दुभाजकामधून वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटून थेट दुचाकीला उडवले. आदिल आणि हमीद दोघे कामावर निघाले होते. त्‍यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याची वाट पाहत थांबले होते. घटनेची नोंद करमाड पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण करत आहेत. आदिलच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आहेत. हमीदवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software