हिसकवायचे होते मंगळसूत्र, हाती लागली ओढणी...वरून नागरिकांनी चोप दिला, पोलिसांनी कोठडीत पाहुणचार केला!; वैजापूरच्या रचना कॉलनीत घडलं काय...

On

वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीवरून दोन मंगळसूत्र चोरटे वैजापूर शहरातील लाडगाव रोडवरील रचना कॉलनीत दाखल झाले. त्‍याचवेळी मुलाला शाळेतून घरी आणणारी २६ वर्षीय विवाहिता त्‍यांच्या नजरेस पडली. लगेचच चोरटे सरसावले. मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करत असतानाच त्‍यांच्या हाती मंगळसूत्राऐवजी ओढणी आली. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या विवाहितेने आरडाओरड सुरू केली आणि बिथरलेले चोरटे दुचाकीवरून धूम ठोकण्याच्या प्रयत्‍नात असतानाच नागरिकांनी पकडले. नागरिकांनी हात साफ केल्यानंतर पोलिसांना बोलावून त्‍यांच्या ताब्‍यात चोरटे देण्यात आले. ही घटना सोमवारी (८ सप्‍टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

मुनीर युसूफ शेख (रा. दत्तनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) व किरण राजू शिंदे (रा. कांदा मार्केट, श्रीरामपूर) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्‍यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्‍यावर मागे नंबर प्लेटसुद्धा नव्हती. चोरट्यांविरुद्ध शितल विशाल दांगोडे (वय २६, रा. रचना कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्‍या मुलाला शाळेतून घरी घेऊन येत होत्‍या. त्‍यावेळी चोरट्यांनी त्‍यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोन्याची चैन हिसकाविण्याचा प्रयत्‍न केला. मागच्याचा प्रयत्‍न फसल्यानंतर दुचाकी चालवणाऱ्यानेही प्रयत्‍न करून पाहिला. पण तोपर्यंत शितल यांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमले. या गोंधळात चोरटे गाडीतून पडले. नागरिकांनी त्‍यांना पकडून बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मेटे यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. वैजापूर पोलिसांचे पथकही आले. दोन्ही चोरट्यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी

Latest News

शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी
डॉ. समीक्षा शर्मा, फिजियोथेरपीस्ट, छत्रपती संभाजीनगरफिजिओथेरपीमध्ये शरीराच्या हालचाली, कार्यक्षमता आणि जीवनमान सुधारण्यासाठी शास्त्रशुद्ध उपचार केले जातात. उपचारांत औषधोपचाराऐवजी व्यायाम, मसाज,...
वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!; सिडको टाऊन सेंटरची घटना
सिडको पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएममधील रोकड राहिली सुरक्षित!; पोलीस आल्याचे पाहून मोहीम अर्धवट सोडून चोरटे पळाले…
हिसकवायचे होते मंगळसूत्र, हाती लागली ओढणी...वरून नागरिकांनी चोप दिला, पोलिसांनी कोठडीत पाहुणचार केला!; वैजापूरच्या रचना कॉलनीत घडलं काय...
रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software