सरकारी नोकरीचे आमिष दाखवून छ. संभाजीनगरच्या भामट्यांचा सिल्लोडच्या १५ जणांना ४९ लाखांचा गंडा

On

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने १५ बेरोजगारांना ४९ लाख रुपयांनी गंडवले. माझी मंत्रालयात ओळख असल्याचे भामटा सांगत होता. भरत दीनानाथ वाहूळ (रा. गौतमनगर, शासकीय दूध डेअरीसमोर, छत्रपती संभाजीनगर) आणि त्‍याचा साथीदार अंकुश रामलाल पवार (रा. गेवराई तांडा, छत्रपती संभाजीनगर) अशा दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (८ सप्‍टेंबर) रात्री आठला गुन्हा दाखल केला आहे.

साहेबराव विठ्ठल वाघमोडे (४२, रा. शिंदेफळ, ता. सिल्लोड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून, त्‍यांच्यासह इतर १४ जणांना वाहूळने गंडा घातल्याचे म्‍हटले आहे. ९ डिसेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२४ या काळात त्‍याने  सिल्लोड तालुक्यातील १५ बेरोजगार युवकांना हेरून जिल्हाधिकारी कार्यालयांसह विविध खात्यांत लिपिक पदाच्या जागा निघाल्या असून, तेथे, तुम्हाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. प्रत्‍येक युवकाकडून १० ते १३ लाख रुपये घेतले. विश्वास बसावा म्हणून त्याने शंभराच्या बॉण्डवर उसनवार पैसे घेत असल्याचे लिहून दिले. काहींना कोरे धनादेशही दिले. वाहूळने फसवल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी धनादेश वटवण्यासाठी बँकेत जमा केले असता ते बाउन्स झाले. बेरोजगार युवकांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले.

अनेकांना बनावट नियुक्‍तीपत्रे...
वाहूळने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून बनावट नियुक्तीपत्रे वाटली. नियुक्‍तीपत्र मिळाल्याने युवक नोकरीच्या ठिकाणी गेले असता ते नियुक्‍तीपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्‍यामुळे त्‍यांचा आनंद क्षणात मावळला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी

Latest News

शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी शरीराला निरोगी अन्‌ कार्यक्षम करणारी फिजिओथेरपी
डॉ. समीक्षा शर्मा, फिजियोथेरपीस्ट, छत्रपती संभाजीनगरफिजिओथेरपीमध्ये शरीराच्या हालचाली, कार्यक्षमता आणि जीवनमान सुधारण्यासाठी शास्त्रशुद्ध उपचार केले जातात. उपचारांत औषधोपचाराऐवजी व्यायाम, मसाज,...
वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!; सिडको टाऊन सेंटरची घटना
सिडको पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएममधील रोकड राहिली सुरक्षित!; पोलीस आल्याचे पाहून मोहीम अर्धवट सोडून चोरटे पळाले…
हिसकवायचे होते मंगळसूत्र, हाती लागली ओढणी...वरून नागरिकांनी चोप दिला, पोलिसांनी कोठडीत पाहुणचार केला!; वैजापूरच्या रचना कॉलनीत घडलं काय...
रक्तबंबाळ नेपाळ...भारतही बारूदाच्या ढिगाऱ्यावर, Gen Z अन्‌ सोशल मीडियाची किती भयंकर आहे सध्याची कहानी...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software