- News
- जिल्हा न्यूज
- गल्लेबोरगावजवळ पिकअप -खासगी टेम्पो ट्रॅव्हलरची टक्कर, ९ प्रवासी गंभीर, अजिंठा घाटात दोन ट्रकच्या अपघ...
गल्लेबोरगावजवळ पिकअप -खासगी टेम्पो ट्रॅव्हलरची टक्कर, ९ प्रवासी गंभीर, अजिंठा घाटात दोन ट्रकच्या अपघातात ३ तास वाहतूक कोंडी!
कायगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने चिमुकल्याचा मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दूध वाहतूक करणारा पिकअप आणि खासगी टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक होऊन ९ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापूर-धुळे महामार्गावरील गल्ले बोरगावजवळ (ता. खुलताबाद) शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) भल्या पहाटे घडली.
ऊसतोडीचा हंगाम ६ वर्षीय मुलाला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ऊसतोडीचे काम संपल्याने आई-वडिलांसह तो पायीच गावाकडे निघाला होता. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव नजीकच्या जोशी फाट्यावर (ता. गंगापूर) शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. विशाल अंकुश पवार (रा. पोळ रांजणगाव, ता. गंगापूर) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोन ट्रक फसल्याने तीन तास वाहतूक कोंडी झाली. घाटाच्या वळणावरच ही वाहने अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. ब्रेक निकामी झाल्याने छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणारा ट्रक अजिंठा घाटात रस्त्याच्या डोंगराकडील बाजूला असलेल्या नालीत फसला. तरीही वाहतूक हळूहळू सुरू होती. मात्र दुपारी दिल्लीकडे कलिंगड घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन तो या ट्रकवर धडकून रस्त्याच्या मध्यभागी तिरपा झाला. घाटाचा रस्ता अरूंद असल्याने रस्ताच वाहनांना जायला जागाच उरली नाही. त्यामुळे तीन तास ही वाहतूक कोंडी झाली. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांनाही याचा फटका बसला. फर्दापूर पोलिसांनी अथक परिश्रम घेत ही कोंडी सोडविली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
28 Feb 2026 22:02:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...

