जेसीबीने अचानक ब्रेक मारले, मागून कार धडकली, शासकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू, करमाडजवळील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समोर धावणाऱ्या जेसीबीने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी कार त्यावर धडकली. यात कारचालक शासकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर- जालना रस्त्यावरील सटाणा फाट्यापुढे मौर्या हॉटेलजवळ रविवारी (२२ फेब्रुवारी) रात्री पावणेअकराला घडली.

निखिल संजयराव मोरे (वय ३३, रा. विद्युत कॉलनी, जालना) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते जालना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी श्वेता (वय ३०) या गर्भवती असून, करमाड पोलिसांनी जालना येथे त्यांच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेतली. तक्रारीनुसार, २२ फेब्रुवारीला संध्याकाळी सहाच्या सुमारास निखिल हे कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला आले होते. श्वेता या त्यावेळी माहेरी होत्या.

त्यांनी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान निखिल यांना कॉल केला असता करमाड पोलिसांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली. निखिल यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे लगेचच निखिल यांचे नातेवाइक छत्रपती संभाजीनगरला आले. निखिल हे कारने (क्र. एमएच २१, व्ही ८६१२) जालन्याकडे येत असताना सटाणा फाट्यापुढे मौर्या हॉटेलजवळ रात्री १० वाजून ५० मिनिटांनी कारसमोर धावणाऱ्या जेसीबीने (एमएच २०, जीई ९७१९) अचानक ब्रेक मारले. त्यामुळे कार जेसीबीवर धडकली. पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software