भरवस्तीत विनाकारण फायर केले २ राऊंड!; निसर्ग कॉलनीत नक्की काय घडलं, FIR मधून आलं समोर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरवस्तीत विनाकारण बंदुकीतून २ राऊंड फायर केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्याच्या होमगार्ड विरुद्ध आज, २८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील बंदुक आणि जीवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.

या प्रकरणात पोलीस अंमलदार शफीक शेख यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रात्री साडेनऊला छावणी पोलिसांना नागरिकांनी कळवले, की निसर्ग कॉलनीत आनंद बुद्ध विहाराजवळ एक जण फायरिंग करत आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक खाजेकर यांनी सहकारी अंमलदार दांडगे, परचाके, सोरमारे, शेख यांच्यासह निसर्ग कॉलनीत धाव घेतली. तिथे आनंद बुद्धविहाराजवळ राहणाऱ्या होमगार्ड प्रसंजीत मनोहर कांबळे (वय ४८) हा त्याच्याकडील परवाना असलेल्या १२ बोअर बंदुकीमधून २ राउंड मानवी वस्तीत काही एक कारण नसताना फायर केले असल्याचे दिसून आले. तो दारूच्या नशेत असल्याचेही दिसून आले. त्यानंतर या ठिकाणाहून यापूर्वी फायर केलेले १७ व आजरोजी फायर केलेले २ खाली केस तसेच १३ जिवंत काडतुसे व १२ बोअरची बंदूक असा एकूण १३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software