युवतीची छेड काढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना जमावाने दिला बेदम चोप!; एमजीएम रस्त्यावरील धक्कादायक घटना (व्हिडीओसह)

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीने पतीसोबत जाणाऱ्या युवतीकडे पाहून दोन परदेशी विद्यार्थ्यांनी अश्लील हावभाव करत शेरेबाजी केली. त्यामुळे युवतीने त्यांना थांबवत जाब विचारला आणि एकाच्या कानशिलात लगावली. या विद्यार्थ्यांनी पुढे कळसच केला. त्यांनी या दाम्‍पत्‍याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते पाहून संतप्त जमावाने या दोन्ही परदेशी विद्यार्थ्यांना बेदम चोप दिला. ही घटना शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी ११ च्या सुमारास एमजीएम रस्त्यावर घडली. महिलेने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी पत्रकारांना दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नक्की काय घडलं...
एमजीएम रुग्णालयाच्या रस्त्यावरून दोन परदेशी विद्यार्थी जात होते. त्याच वेळी पतीसह दुचाकीवरून युवती जात होती. या विद्यार्थ्यांनी तिची छेड काढली. सुरुवातीला युवतीने दुर्लक्ष केले. मात्र, तरुणांची अश्लील शेरेबाजी आणि हावभाव वाढत गेल्याने तिचा संयम सुटला. तिने त्या विद्यार्थ्यांना अडवत थेट कानशिलात लगावली आणि सुनावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या परदेशी विद्यार्थ्यांनी चक्क दाम्पत्यालाच मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे पाहून तिथे जमलेल्या जमावाचाही तोल सुटला. त्यांनी मग दोन्ही परदेशी विद्यार्थ्यांना चांगलेच बुकलून काढले. हा प्रकार घडत असतानाच महापौर समीर राजूरकर त्याच रस्त्याने एका कार्यक्रमासाठी जात होते.

गर्दी पाहून तेही थांबले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्याच वेळी सिडको पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड सहकाऱ्यांसह आले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी युवतीला तक्रार देण्याबाबत चर्चा केली असता तिने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. हे विद्यार्थी आफ्रिका खंडातील सुदान देशाचे असून, काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत आहेत. दिल्ली गेट परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आता सिडकोतील नामांकित शिक्षण संस्थेत बी. कॉम. साठी प्रवेश घेतला आहे. घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली आहे. त्यांचे तीन मित्र पोलीस ठाण्यात आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software