बाळासाहेब आंबेडकर अन्‌ मी एकत्र आलो तर... छत्रपती संभाजीनगरमध्ये रामदास आठवलेंनी केली अपेक्षा व्यक्त, म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : न्यायालयाने राममंदिराचा प्रश्न सोडवला, तसा बुद्धगयेचा प्रश्नदेखील सोडवावा. आमची मागणी केवळ त्या ट्रस्टमध्ये सर्व सदस्य बौद्ध असावेत, एवढीच आहे. बुद्धगयेचे महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात असले पाहिजे. ते मिळणारच आहे. हा प्रश्न राममंदिर व बाबरी मशिदीसारखा गंभीर नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) व्यक्त केले.

विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी येथे पाचदिवसीय जागतिक धम्म परिषद होत असून, दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्‌घाटक म्हणून आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी म्यानमारचे भिक्खु आसिन रामतारा सयाडो होते. स्वागताध्यक्ष भदन्त उपगुप्त महाथेरो, भदन्त करुणाबोधी महाथेरो (संकेशा), हर्षबोधी (बुद्धगया) यांच्यासह देश-विदेशातील २०० हून अधिक भिक्खू, भिक्खुणी संघाची उपस्थिती होती. या वेळी मंत्री आठवले म्हणाले, की बुद्धगयेच्या महाविहार ट्रस्टमध्ये सर्व आठ सदस्य व अध्यक्ष आमचेच असावेत. त्यासाठी कायदा बदलणे आवश्यक आहे. काँग्रेससह सर्व पक्षाची सरकारे येऊन गेली, पण त्यांनी कायदा का बदलला नाही? मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलो, तरी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच शिष्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या मूळ गावी वडनेर येथे बुद्धकाळात मोठे बौद्ध प्रशिक्षण केंद्र होते. या केंद्राला चिनी प्रवासी ह्युयंगत्संग येऊन गेले. तेथे पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आणले होते, असेही त्यांनी सांगितले. धम्म परिषदेसाठी ७५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही आठवले यांनी केली. संयोजिका भिक्खुणी धम्मदर्शना यांनी प्रास्ताविक केले. मंचावर बाबूराव कदम, मिलिंद शेळके, किशोर थोरात यांची उपस्थिती होती. परिषदेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती.

...तर समाजाला चांगले भवितव्य!
३ एप्रिलपर्यंत माझा राज्यसभेचा कार्यकाळ असून, १२ वर्षांपासून मी राज्यसभेत आहे. आता संधी मिळाली तर रेकॉर्डब्रेक करू शकतो. मला नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आलो, तर समाजाला चांगले भवितव्य आहे. पण, बाळासाहेबांना हे मान्य नाही. ते निवडणुकांमध्ये सतत प्रयत्न करीत आहेत, पण अपेक्षित मतदान घेऊ शकत नाहीत. प्रभाग पद्धत रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आठवले म्हणाले. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, महाविहाराच्या कायद्यात सुधारणा करावी, या महाविहाराचा चेअरमन बौद्ध असावा, सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात चार महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिल्याचे आठवले म्हणाले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software