३० वर्षीय युवतीला एकतर्फी प्रेमातून जाच!; व्हॉट्‌स ॲपवर धमकावले, सोबत राहण्यासाठी जबरदस्ती, सिडकोतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३० वर्षीय युवतीला एकतर्फी प्रेमातून जाच केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध सिडको पोलिसांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे. तो व्हॉट्‌स ॲपवर युवतीला सोबत राहण्यासाठी धमकावत होता.

युवती धुणीभांडीची कामे करते. ती सिडको एन १२ मध्ये राहते. गुरुवारी (२६ फेब्रुवारी) रात्री सव्वा अकराला ती घरी असताना तिच्या ओळखीच्या विजू श्रीरंग मानके (रा. बरकतपूर ता. कन्नड) याने तिला कॉल केला. तिने कॉल कट केला. तेव्हा त्याने व्हॉट्‌स ॲपवरून तिला अश्लील शिवीगाळ केली. दीड महिन्यापूर्वी युवतीच्या मुलीकडून युवतीचा फोटो स्टेटसला पडला होता. त्याचा स्क्रीनशॉट विजूने काढलेला आहे. तू माझ्यासोबत रहा. तू जर माझ्या सोबत राहिली नाहीस तर तुझा फोटो व्हायरल करेल, अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत युवतीने म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार देविदास राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना

Latest News

माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना माहेरी राहणाऱ्या विधवा तरुणीचे रोडरोमिओने जगणे केले मुश्कील!; लग्न करण्यासाठी करतोय बळजबरी, घरात दगड फेकले, जीवे मारण्याची धमकी...पुंडलिकनगर भागातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
वायर चोरी करणाऱ्या चोरट्याची सुरक्षारक्षकासह चौघांनी केली हत्या!; सातारा परिसरातील धक्कादायक घटना
संशयावरून पतीचा मोबाइल तपासला, महिलेसोबत दिसले चॅटिंग!, पुढे जे घडलं ते धक्कादायक..३० वर्षीय विवाहितेने सांगितली करमाड पोलिसांना आपबिती!!
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software