पैठणला गूढ आवाजाचे हादरे, नागरिकांत घबराट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठणला मंगळवारी (३० सप्टेंबर) दुपारी २:४४ वाजता गूढ आवाजाचे हादरे बसले. आवाजाची तीव्रता ३५ किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याने सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. मात्र प्रशासनाने हा भूकंप नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. जलदबावामुळे भूगर्भात हालचाली होऊन गूढ आवाज येत असल्याची शक्यता तहसीलदार ज्योती पवार यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून वेळोवेळी पैठण शहर, परिसरात असे गूढ आवाज येत असतात. आवाजांचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. मंगळवारी दुपारी आवाजामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले होते.

जायकवाडी उत्तर येथील गेल्या सात वर्षांपासून बंद असलेले भूकंपमापन केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी केली आहे. यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले, की नवीन भूकंपमापन यंत्र बसवण्यासाठी नाशिकला पैसे पाठविले असूनही अद्याप त्यांनी यंत्र बसवलेले नाही. यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करू. नाशिकच्या मेरी संस्थेने भूकंप झाल्याची कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी

Latest News

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software