...अन्यथा मीच शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेन!; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा, पैठण तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण तालुक्यातील रजापूर येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची दिव्यांच्या प्रकाशात गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री ८ वाजता पाहणी केली.  शेतकरी संजय खाडे, गणपत काळे, प्रल्हाद काळे या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती देताना अश्रु अनावर झाले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये प्रती हेक्टर मदत द्यावी व दिवाळीपूर्वी कर्जमाफी करावी. अन्यथा शेतकऱ्यांसोबत मीच रस्त्यावर उतरेन, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या रजापूर येथील शेतकरी  सोनू मोहन गोर्डे यांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

त्यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे, माजी सभापती सुनील शिंदे, शिवसेना उपनेते सचिन घायाळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, अप्पासाहेब गायकवाड, आनंद भालेकर, मनोज पेरे, रजापूरच्या सरपंच मनीषा ज्ञानेश्वर शिंदे, आसाराम गोर्डे आदी उपस्थित होते. पैठण तालुक्यातील पंथेवाडी येथील मेंढपाळ मल्हारी डोईफोडे व अंबादास खोलाडे यांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

लोकप्रतिनिधींचे दौरे
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यातील लिंबगाव, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी कन्नड तालुक्यातील नेवपूर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा, तिडका, घोसला, निमखेडी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार कल्याण काळे यांनी कोळी बोडखा, मुरमा आदी ठिकाणी पाहणी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software