वाळूतस्करांची नेवाशातून गंगापूरमध्ये घुसखोरी : गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई, २३ लाखांच्या बोटींसह मशीन जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नेवासा तालुक्यातून गंगापूर तालुक्यात घुसखोरी करत गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून नेत असलेल्या तिघांच्या २ बोटी आणि वाळू उपशाचे मशीन जप्त करण्यात गंगापूर पोलिसांना यश आले. ही कारवाई मंगळवारी (३० डिसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील लखमापूर शिवारात करण्यात आली.

जामगावचे बीट अंमलदार विजय पाखरे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली, की काही लोक नेवासा ह‌द्दीतून लखमापूर शिवारात गोदावरी नदी पात्रात येऊन बोटीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. तो बोटीच्या साह्याने नेवासा ह‌द्दीत नेऊन विकत आहेत. राठोड यांनी लगेचच सहकाऱ्यांसह लगेचच रात्री साडेनऊच्या सुमारास लखमापूर शिवाराकडे धाव घेतली. तिथे दोन लोखंडी बोट दिसल्या. पैकी एका छोट्या बोटमध्ये एक जण व वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी मशिन होती. दुसऱ्या मोठ्या बोटींमध्ये दोघे होते. पोलिसांना पाहून तिघेही त्यांच्या बोटी लखमापूर शिवारातील नदीच्या किनारी घेऊन गेले व अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी मशिन, दीड ब्रास वाळू, दोन्ही बोटी असा एकूण २३ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष झोरे करत आहेत. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के, पोलीस अंमलदार विजय पाखरे, गणेश जाधव, भागवत खाडे व संदीप राठोड यांनी भाग घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software