आशासेविकेचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून मैत्रिणी, नातेवाइकांना करतोय मेसेज!, सायबर भामट्याचा प्रताप, वैजापूर तालुक्यातील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय आशासेविकेचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून सायबर भामट्याने तिच्या मैत्रिणी, नातेवाइकांत बदनामी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हादरलेल्या आशासेविकेने विरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, आशासेविकेचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे, पण ते ती जास्त वापरत नाही. गेल्या १ ऑक्‍टोबरला कामावर असताना त्यांच्या मैत्रिणीने त्यांना कॉल करून ‘तू मला रात्री एवढ्या उशिरा इन्स्टाग्रामवर मेसेज का करते, असे विचारले. त्यामुळे आशासेविकेला कळले, की तिचे अकाऊंट कुणीतरी हॅक केले आहे. ती व्यक्ती परस्पर तिच्या मित्र- मैत्रिणींना, नातेवाइकांना तिच्या नावाचा, पदाचा व फोटोचा गैरवापर करून मेसेज करत आहेत. तो कोण आहे, हे कळावे म्हणून आशासेविकेने त्याला कॉल कर, असे सांगितले. मात्र उडवाउडवीचे उत्तर देऊन वारंवार मेसेज करत आहे. त्यामुळे महिलेने अखेर विरगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस त्या सायबर भामट्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आर. माधवनची विशेष मुलाखत : ‘धुरंधर' गेम चेंजर ठरेल आधीच कल्पना होती, देशापेक्षा वर काहीही नाही...

Latest News

आर. माधवनची विशेष मुलाखत : ‘धुरंधर' गेम चेंजर ठरेल आधीच कल्पना होती, देशापेक्षा वर काहीही नाही... आर. माधवनची विशेष मुलाखत : ‘धुरंधर' गेम चेंजर ठरेल आधीच कल्पना होती, देशापेक्षा वर काहीही नाही...
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर ४३ दिवसांत जगभरात १२७५.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अलीकडच्या काळात हा सर्वात चर्चेत...
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software