वडिलांमुळे कुणी लग्नासाठी मुलगी देत नव्हतं, खून करून घरात पुरले, शेणाने सारवले, खुनाचा नाही पश्चाताप!, क्रूरकर्मा रामेश्वरची कबुली, पैठण तालुक्यातील थरारकहानी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडिलांच्या वागण्यामुळे कुणी मुलगी देत नसल्याने माझे लग्न होत नव्हते. सततच्या भांडणाला वैतागून काठीने मारून त्यांचा खून केला. घरातच खड्डा खोदून मृतदेह पुरला. घर शेणाने सारवून घेतले. मात्र खड्डा कमी खोल असल्याने मृतदेह कुजून वास सुटला... आपण केलेल्या खुनाचा पश्चाताप नसल्याचे रामेश्वर कल्याण काळे (वय २८, रा. कडेठाण, ता. पैठण) याने पोलिसांना सांगितले.

मुलानेच पित्‍याचा खून करून मृतदेह राहत्‍या घरात पुरून टाकल्याची घटना शनिवारी (२२ नोव्‍हेंबर) सकाळी कडेठाण (ता. पैठण) येथे समोर आली होती. मृतक  कल्याण बाबुराव काळे (वय ६८) यांना रामेश्वर आणि लक्ष्मण काळे (वय २२) अशी दोन अविवाहीत मुले आहेत. पत्नी सुमनबाई (वय ६२) भोळसर आहेत. घटनेवेळी लक्ष्मण ऊसतोडीसाठी बाहेरगावी होता. कल्याण पत्नी सुमनबाई व मुलगा रामेश्वरसोबत गायरान जमिनीवरील जुन्या माळवदाच्या घरासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. रामेश्वर आणि त्याचे वडील कल्याण दोघेही दारू पित. त्यांच्यात नेहमी भांडण होत होते. वडिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्याला लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही, याचा राग रामेश्वरला होता.

१३ नोव्‍हेंबरला त्याने सततच्या भांडणाला वैतागून कल्याण यांना काठीने बेदम मारहाण करत कल्याण यांचा खून केला. खुनाची कुणाला भणक लागू नये म्हणून माळवदाच्या घरातच खड्डा खोदून मृतदेह पुरला. शंका येऊ नये म्हणून ते घर शेणाने सारवून घेतले. मात्र खड्डा कमी खोल असल्याने मृतदेह कुजून वास सुटल्याने दुर्गंधी पसरली. शनिवारी (२२ नोव्‍हेंबर) सकाळी सुमनबाई यांनी दिराला घडलेला प्रकार सांगितला. दिराने पाचोड पोलिसांना कळवले. पोलिसांनी लगेचच घटनास्‍थळी धाव घेऊन रामेश्वरला ताब्यात घेतले. मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थ व महसूल कर्मचाऱ्यांसमोर उकरून बाहेर काढला. रामेश्वरचा लहान भाऊ लक्ष्मण काळे हा उसतोडीला गेल्याने त्याला घटनेची माहिती देण्यात आली.

तो रात्री उशिरा आल्यानंतर त्याच्या तक्रारीवरून रामेश्वरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. रविवारी (२३ नोव्‍हेंबर) दुपारी रामेश्वरला पोलिसांनी पैठणच्या न्यायलयासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (२५ नोव्‍हेंबर) पोलीस कोठडी सुनावली. रामेश्वरची आई सुमनबाई काळे भोळसर असली तरी आपल्या मुलाने डोळ्यांदेखत पतीचा खून केल्याने आपणावर वैधव्यपण ओढवल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. अधिक तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते, रवींद्र आंबेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software