गंगापूर विधानसभा : मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म ७ भरून द्यावा, अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व तहसील कार्यालय गंगापूर येथे गंगापूर विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबत चौकशी व कारवाई करण्यासाठी नुकतीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली व भारतीय लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५० अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. रांजणगाव शेणपुंजी येथे १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत दुबार मतदारांची पडताळणी व नाव वगळणी याबाबत फॉर्म क्रमांक ७ भरण्यासंदर्भात विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १५१ मतदारांचे नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म क्रमांक ७ भरण्यात आले.

अन्य मतदारांबाबतही मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यासंदर्भात बैठक घेऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी या दुबार मतदारांच्या याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपलब्ध करून दिल्या असून जे मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत त्याबाबत पंचनामा करावा, असे निर्देश दिले आहेत. गंगापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी प्राप्त दुबार मतदारांची यादी, तक्रारी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळ www.chhatrapatisambhajianagar.maharashtra.gov.in येथे प्रसिद्ध केली आहे.

याच याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्या आहेत. मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करावे. आपले नाव त्यात दुबार असल्यास ते नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे याबाबत आवश्यक पुराव्यांसह मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संपर्क साधावा व जेथून नाव वगळावयाचे आहे तेथे फॉर्म नं.७ भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्यावा. अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software