सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने पार्थिव ग्रा. पं. समोर आणून रचले सरण, खुलताबादच्या खांडीपिंपळगावमध्ये तणाव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ग्रामपंचायतीच्या वेळकाढू आणि गलथान कारभारामुळे खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगावमध्ये सोमवारी (१५ डिसेंबर) तरुणावर अंत्यसंस्कार करण्यावरून दोन समाजांत नाराजी निर्माण झाल्याचा प्रकार घडला. सुतार समाजातील तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर मृतदेह नेहमी जिथे अंत्यविधी होतात तिथे नातेवाइक घेऊन गेले. मात्र शेतकऱ्याने विरोध केला. त्यामुळे अंत्‍यविधी कुठे करायचे, असा प्रश्न नातेवाइकांना पडला. त्यां नी मृतदेह थेट ग्रामपंचायतीसमोर आणून जाळण्याची तयारी केली. सरण रचण्यात आले. त्यामुळे तणाव वाढला. तहसील, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाने स्मशानभूमीसाठी २० गुंठे गायरान जमीन उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

खांडीपिंपळगावमध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडलेला आहे. गावात ज्यांच्याकडे शेती आहे, ते शेतकरी आपापल्या शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र ज्यांच्याकडे शेती नाही, त्यांची अडचण होत असते. वारंवार ग्रामपंचायतीसमोर हा प्रश्नही येऊन पदाधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला. यापूर्वीही अंत्यविधीवरून असाच वाद उद्‌भवला होता. सोमवारी मात्र हा वाद चिघळल्याने अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. गावातील सुतार समातातील विशाल रोहिदास वाघचौरे (वय २३) याचा वाळूजजवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत रविवारी रात्री पावणेआठला मृत्यू झाला. पार्थिव गावात आणल्यानंतर नातेवाइकांनी सोमवारी सकाळी अंत्यविधीची तयारी सुरू केली.

गावाजवळील एका शेतात सुतार समाजातील व्यक्तींवर अंत्यसंस्कार होत आले आहेत. या शेतकऱ्याच्या वाडवडिलांनी तशी परवानगी दिलेली होती. मात्र नंतरच्या काळात वाटण्या झाल्या. त्यामुळे अंत्यविधीसाठी पार्थिव आणताच शेतकऱ्याने विरोध केला. त्यामुळे नाराजी सुरू झाली. गावात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने वारंवार असे वाद उद्‌भवत असल्याने ग्रामस्थ आणि नातेवाइक एकत्र आले आणि त्यांनी थेट सरण ग्रामपंचायतीसमोर रचले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच खुलताबादचे नायब तहसीलदार सुभाष पांढरे, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे सहकाऱ्यांसह खांडीपिंपळगावमध्ये आले. त्यांनी नातेवाइक आणि ग्रामस्थांसोबत चार तास चर्चा केली. गायरान जमिनीपैकी २० गुंठे जागा स्मशानभूमीसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली. त्या ठिकाणी तत्काळ साफसफाई करण्यात आली आणि दुपारी ३.३० ला अंत्यसंस्कार करण्यात आले.

यापूर्वीही १ सप्टेंबरला अंत्यविधीवेळी पाऊस आल्याने नातेवाइकांची तारांबळ उडून सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतरही ग्रामपंचायतीने हा विषय गांभीर्याने घेतला नव्हता. गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी सांगितले, की खांडीपिंपळगावमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी जनसुविधा योजनेतून १० लाख रुपये तसेच सुशोभीकरणासाठी १० लाख असे २० लाख रुपये मंजूर आहेत. दरम्यान, माजी सरपंच सज्जनसिंह झाला यांनी सांगितले, की निधी नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. आता तातडीने २१ डिसेंबरला काम सुरू करण्यात येईल. युवा नेते प्रवीण इंगळे यांनी हा प्रश्न रखडण्याला ग्रामपंचायतीला जबाबदार धरले. आपण कोणत्याही परिस्थितीत २१ डिसेंबरला स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात होईल यासाठी आक्रमक राहणार असल्याचे सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!!

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!! छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन तारुण्यात एक चूक आता अवघ्या विशीतल्या मुलांना कायद्याच्या जंजाळात अडकवणारी ठरली आहे. नायलॉन...
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या ६ गायी पोलिसांनी वाचवल्या!; हर्सूल ते रेंगटीपुरा, मध्यरात्री पिकअपने घडवला सिनेस्‍टाइल थरार
लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?
इन्व्हर्टरवर चुकूनही चालवू नका या गोष्टी, लगेचच सर्व वीज संपवून टाकतील, नवीन बॅटरी घ्यावी लागेल विकत!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software