बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील समाधान जनार्धन गोरसे (वय २१) हा १२ डिसेंबरपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आज, १६ डिसेंबरला सकाळी ११ च्या सुमारास घराजवळील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्‍महत्‍या केली, की अपघाताने विहिरीत पडला हे अद्याप समोर आलेले नाही. वैजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.

समाधान पोलीस भरतीची तयारी करत होता. रोज पहाटे व्यायामासाठी जात होता. शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी ७ वाजले तरी तो परला नाही. नऊपर्यंतही तो न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. अखेर वैजापूर पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली. पोलीस आणि नातेवाइक शोधत असतानाच आज सकाळी ११ ला समाधानचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. वैजापूर पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी १ ला मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्यावर दुपारी चारला अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार श्री. झाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software